प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:54 IST2018-03-27T00:53:17+5:302018-03-27T00:54:01+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पहिल्या वर्षी ज्यांना शिवसेनेकडून विविध पदांची संधी दिली गेली अशांना डावलून इतर इच्छुकांचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेत चुरस
नरेंद्र दंडगव्हाळ ।
सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही सिडको प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र, सभापतिपदासाठी यंदा इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पहिल्या वर्षी ज्यांना शिवसेनेकडून विविध पदांची संधी दिली गेली अशांना डावलून इतर इच्छुकांचा विचार केला जाणार असल्याचे समजते. सिडको प्रभागातून नगरसेवक हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे यांच्या नावांची चर्चा आहे. सिडकोचे एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१ चा समावेश करण्यात आला आहे. या सहा प्रभागातील २४ नगरसेवकांमध्ये सेनेच्या कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव आदींचा समावेश आहे. तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, नितीन ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, संगीता आव्हाड आदींचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले यांचा समावेश आहे. शिवसेना १४, भाजपा ९ व राष्टÑवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे.सिडको प्रभागात सेनेच्या पाठोपाठ भाजपा दुसºया क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगर सेवक नव्हता, परंतु मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली होती. मागील निवडणुकीत नाशिक मनपामध्ये सत्ता असलेल्या मनसेचे सिडको प्रभागात आठ नगरसेवक होते. यंदा मात्र एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तर कॉँग्रेस, माकपादेखील हद्दपार झाली. सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे.
सभापतिपदाची संधी कुणाला?
सेनेने पहिल्या वर्षी सिडको प्रभागातून सभापती म्हणून सुदाम डेमसे यांची तर स्थायी समितीवर डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे यांना संधी दिली आहे, तर श्यामकुमार साबळे यांना वृक्षप्राधिकरण समितीवर घेतले आहे. पहिल्या वर्षी ज्या सदस्यांना संधी देण्यात आली आहे त्यांना वगळून इतर सदस्यांना दुसºया वर्षी संधी देण्यात येणार असल्याचे समजते. नगरसेवक हर्षा बडगुजर या दुसºयांदा नगरसेवक झाल्या असून, पहिल्या पंचवार्षिकमध्ये पाच वर्षांत त्यांना एकही पद दिले नाही. मागील वर्षीदेखील त्यांना सभापतिपदाची संधी होती, परंतु ऐनवेळी त्यांना डावलून नगरसेवक सुदाम डेमसे यांची सभापतिपदी वर्णी लागली. यंदा हर्षा बडगुजर यांना सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी बडगुजर यांच्या बरोबरच नगरसेवक श्यामकुमार साबळे व चंद्रकांत खाडे यांनीदेखील इच्छा व्यक्त केली आहे.