शिवसेनेतर्फे रक्त संकलनाचा हजार पिशव्यांचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST2021-06-03T04:11:44+5:302021-06-03T04:11:44+5:30
बुधवारी पंचवटीतील कमलनगर, हिरावाडी येथे शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे, नगरसेविका पूनमताई मोगरे यांनी हे शिबिर आयोजित केले होते. ...

शिवसेनेतर्फे रक्त संकलनाचा हजार पिशव्यांचा टप्पा पार
बुधवारी पंचवटीतील कमलनगर, हिरावाडी येथे शिवसेना महानगर संघटक दिगंबर मोगरे, नगरसेविका पूनमताई मोगरे यांनी हे शिबिर आयोजित केले होते. उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुनील बागूल, वसंतराव गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, महेश बडवे, योगेश बेलदार, गणेश बर्वे, मंगला भास्कर, राजेंद्र वाकसरे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिबिरात सचिन आढाव, सुशांत लाटे, ओंकार बागुदे, तौसिफ शेख, संतोष सोनवणे, स्वप्निल ठाकरे, बबलू सोनवणे, भूषण मंडलिक, अमित घोलप, प्रदीप बोरसे, विशाल निकम, मोहित भडांगे, ओम महेंद्रे, भूषण पाटील, भिकन सोनवणे, भूषण कांबळे, आकाश शेंडगे, प्रीतम खैरनार, राजेश ससाने, अरुण गायकवाड, आदींसह १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. शिवाजी लांडे, किरण वैष्णव, गौरव शीताळे, मनीषा सूर्यवंशी, प्रतिभा ढिकले, समीर मणियार, सागर पगारे, राजकुमार मोरे, अनिल जोशी यांनी सहकार्य केले. यावेळी शिबिरात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी काढून देण्यात आली.