इगतपुरीत शिवसेना तर त्र्यंबकला भाजपाने गड राखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:13 IST2017-12-11T12:50:27+5:302017-12-11T14:13:01+5:30
नाशिक -जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने गड कायम राखण्यात यश मिळविले.

इगतपुरीत शिवसेना तर त्र्यंबकला भाजपाने गड राखला
नाशिक -जिल्ह्यातील इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेने तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने गड कायम राखण्यात यश मिळविले. इगतपुरीत शिवसेनेचे संजय इंदुलकर तर त्र्यंबकेश्वरला भाजपाचे पुरूषोत्तम लोहगावकर विजयी झाले आहेत. इगतपुरीत एकूण १८ जागा होत्या. त्यात शिवसेनेला १३, भाजपाला ४ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. त्र्यंबकेश्वर येथे एकूण १७ जागांपैकी भाजपा १४, शिवसेना २ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग ५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या आशा रमेश भामरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपा व शहर विकास आघाडीच्या नर्मदा सुरेश सोनवणे यांचा पराभव केला.