शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नेतृत्व बदलाद्वारे महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी !

By किरण अग्रवाल | Published: December 20, 2020 12:34 AM

पक्षाच्या नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आरंभ करून दिला आहे. त्रिपक्षीय महाविकास आघाडीने लढण्याऐवजी स्वबळावर नाशिक महापालिकेवर भगवा फडकाविण्याचे शिवधनुष्य बडगुजर उचलतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण विद्यमान सत्ताधारी व प्रबळ विरोधक भाजपनेसुद्धा याचदृष्टीने मार्गदर्शक नेतृत्वाचा बदल घडवून आणत जयकुमार रावल यांच्याकडे नाशिक महानगराचे प्रभारी पद सोपविले आहे, त्यामुळे सामना आतापासूनच रंगला तर आश्चर्य वाटून न घेता त्याकडे या निवडणुकीची नांदी म्हणूनच बघता यावे.

ठळक मुद्देशिवसेना व भाजपने घेतले मनावर... टार्गेट महापालिका, झेडपीचे काय?...पदरमोड करून पक्षासाठी काही करू शकण्याची बडगुजर यांची क्षमता वादातीत ठरावी. ​​​​​​​ महापालिका निवडणुकीचा बिगुल वर्षभराआधीच वाजून गेल्याचे म्हणता यावे.

सारांशशिवसेनेच्या नाशिक महानगर-प्रमुखपदाचा खांदेपालट करताना महापालिकेच्या राजकारणाची व एकूणच तेथील सर्व स्थितीची सर्वार्थाने माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे हा पदभार सोपविला गेल्याने यामागे आगामी निवडणुकांत महापालिकेवर भगवा फडकविण्याचे या पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट व्हावे. अर्थात एकीकडे हे होत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी भाजपतील मार्गदर्शक नेतृत्वाचाही सांधेबद्दल घडून आल्याने महापालिका निवडणुकीचा बिगुल वर्षभराआधीच वाजून गेल्याचे म्हणता यावे.वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सारेच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातून संबंधितांची सक्रियता वाढलेली दिसत आहे. पक्ष संघटनात्मक पातळीवर होऊ लागलेल्या फेरबदलांकडेही या निवडणुकीची तयारी म्हणूनच बघता यावे. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांच्या पातळीवर सुस्तता असताना शिवसेनेने निवडणूक तयारीच्या दृष्टीने आघाडी घेतलेली दिसत आहे. मध्यंतरी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सचिन मराठे यांच्याकडे महानगरप्रमुखपद सोपविले गेले होते. प्रथमच कार्यक्षेत्राची विभागणी करीत त्यांच्या जोडीला महेश बडवे यांनाही महानगरप्रमुखपदाची धुरा सोपविली गेल्याने संघटनात्मक बांधणी आणखी घट्ट होईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती; परंतु पुढील काळात तसे काहीही होताना दिसून आले नाही. पक्ष संघटना एकीकडे आणि महापालिका व जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी दुसरीकडे अशीच स्थिती राहिली.सत्ताधारी पक्षाच्या म्हणून येणाऱ्या मर्यादा समजून घेता येणाऱ्या असल्या तरी, सरकारी आशीर्वादाचे सार्वजनिक उपक्रम किंवा त्यातील सहभागिताही दिसून येऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा महापालिकेतील सत्तेचे स्वप्न बघायचे तर सक्रियता व तेथील सत्ताधारी भाजप विरोधातील आक्रमकता शिवसेनेसाठी गरजेची बनली आहे. त्याचदृष्टीने महानगरप्रमुखपदी महापालिकेतील माहीतगार सुधाकर बडगुजर यांची नेमणूक केली गेली असावी. यात महापालिकेमध्ये या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अन्य नेत्यांना चपराक लगावतानाच निवडणुकीतील तिकीट वाटपाच्या दोर्‍या आपल्या हाती ठेवू पाहण्याची संपर्कप्रमुखांची राजकीय खेळी असेलही; पण पदरमोड करून पक्षासाठी काही करू शकण्याची बडगुजर यांची क्षमता वादातीत ठरावी.विशेष म्हणजे बडगुजर यांची निवड घोषित होऊन दोन दिवस होत नाही तोच भाजपतील खांदेपालटही समोर येऊन गेला. राज्याचे माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे या पक्षाने नाशिक महानगराचे प्रभारी म्हणून जबाबदारी हस्तांतरित केली असून, उत्तर महाराष्ट्राच्या संघटन मंत्रिपदाची सूत्रेही रवि अनासपुरे यांच्याकडे सोपविली आहेत. हे तसे पूर्वीच झालेले असले तरी या दोघांनी अलीकडेच नाशकात बैठक घेऊन ओळख परेड घेतली व महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे रणशिंग फुंकले. या नेतृत्व बदलामुळेच माजी आमदार व पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले बाळासाहेब सानप यांची घरवापसी होऊ घातली आहे. त्यामुळे भाजपची कमानही मजबूत होईल. बडगुजर व सानप दोन्हीही महापालिकेतील माहीतगार असल्याने त्यांच्या माध्यमातून सेना व भाजपतील सामना चुरशीचा ठरेल.टार्गेट महापालिका, झेडपीचे काय?...महापालिका निवडणुकीची तयारी होत असताना जिल्हा परिषदेबाबत मात्र कुणाची फारशी उत्सुकता दिसत नाही. कोरोनामुळे या दोन्ही संस्थांतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले हे खरे; परंतु त्यापूर्वीचा आढावा घेता महापौर रंजना भानसी यांच्यापेक्षा जि.प.तील शीतल सांगळे यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अधिक प्रभावी व उजवी ठरलेली दिसून येते. तेव्हा त्या बळावर व राज्यातील सत्तेच्या जोरावर शिवसेनेला जिल्हा परिषदेतील आपला ग्राफ वाढवायचीही संधी घेता यावी, पण त्याबाबत हालचाल होताना दिसू शकलेली नाही.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण