शिवसंपर्क अभियानास घोटी येथून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:58 IST2021-07-14T22:56:33+5:302021-07-15T00:58:50+5:30

घोटी : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवसंर्पक अभियानास जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोटी येथून सुरुवात करण्यात आली.

Shiv Sampark Abhiyan started from Ghoti | शिवसंपर्क अभियानास घोटी येथून सुरुवात

शिवसंपर्क अभियानास घोटी येथून सुरुवात

ठळक मुद्देघोटी : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवसंर्पक अभियानास जिल्हाध्यक्ष विजय करंजकर

घोटी : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवसंर्पक अभियानास जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोटी येथून सुरुवात करण्यात आली.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वत्र शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन शाखाप्रमुखांनी महाविकास आघाडीने राबविलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे आवाहन करंजकर यांनी यावेळी केले. व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुका प्रमुख भगवान आडोळे, रमेश गावित, सभापती सोमनाथ जोशी, जि. प. सदस्य कावजी ठाकरे, उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, युवा सेना प्रमुख मोहन ब-हे, उपसरपंच अनिल भोपे, कचरू डुकरे, नंदलाल भागडे, गटनेते विठ्ठल लंगडे, रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, आकाश खारके, अशोक सुरुडे, मथुरा जाधव, स्वाती कडू, माजी नगरसेवका अलका चौधरी आदी उपस्थित होते.

घोटी गणात शिवसंपर्क अभियानांचे नियोजन घोटी शहर अध्यक्ष गणेश काळे यांनी केले.
यावेळी संजय जाधव, दौलत बोंडे, अरुणा जाधव, जालिंदर काळे, समाधान भागडे, शेखर दिवटे, दीपक गायकवाड, हिरामण कडू, अनिल काळे, विक्रम मुनोत, समीर ठाकुर, लक्ष्मण भगत, विलास रुपवते, विकास जाधव, भूषण घोटकर आदी उपस्थित होते.
(१४ घोटी सेना)
शिवसंपर्क अभियानात मार्गदर्शन करतांना विजय करंजकर समवेत, निवृत्ती जाधव, निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, रमेश गावित, भगवान आडोळे आदी.

Web Title: Shiv Sampark Abhiyan started from Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.