शिवछत्रपती कुस्ती चषक स्पर्धा मालेगाव : महानगर तालीम संघ-मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST2018-03-05T00:06:59+5:302018-03-05T00:06:59+5:30
मालेगाव : येथील मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.

शिवछत्रपती कुस्ती चषक स्पर्धा मालेगाव : महानगर तालीम संघ-मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजन
मालेगाव : येथील मालेगाव महानगर तालीम संघ व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. ८६ किलोपुढील खुले पाच जिल्हे उत्तर महाराष्टÑ केसरीसाठी खुलागट ठेवण्यात आले होते. ३२ किलो ते ८६ किलो व ओपर गट ठेवण्यात आले होते. कुस्ती स्पर्धा गादी विभागात आंतरराष्टÑीय पंच यांच्या नियोजनात घेण्यात आली. त्यात सरजीत शेख ३२ किलो (प्रथम), दिपक देवकर ३८ किलो, रोहित परदेशी ४२ किलो, जयेश गांगुर्डे ४६ किलो, गणेश कडनोर ५० किलो, अशोक जाधव ५७ किलो, शेख सोहिल ६१ किलो, गोपाल कडनोर ६५ किलो, प्रवीण चांगरे ७० किलो, आसीफ सय्यद ७४ किलो, धनंजय पवार ७९ किलो, विजय गवळी ८६ किलो व ओपन केसरीचा मानकरी सखाराम खांडेकर पैलवान हे विजेते ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर सखाराम घोडके, नगरसेवक जे. पी. बच्छाव, जि. प. सदस्य समाधान हिरे, राजेंद्र भोसले, जी. के. पाटील, पोलीस निरीक्षक विश्वकर्मा, शरद पाटील, राजेंद्र डांगचे, जितेंद्र देसले, भूषण बच्छाव, निलेश आहेर, साईनाथ गिडगे, सुरेश गवळी, गोटू पाटील, अनिल पाटील, राजेश अलिझाड, किरण पाटील, गणेश पाटील, भय्या हिरे, धनंजय शेलार, कमलेश बच्छाव, जगदीश भुसे, आबा आहिरे, बाळू बोरसे, विकी चव्हाण, पवन पाटील, विठ्ठल बागूल, यशपाल बागूल, जयेश ब्राह्मणकर, विजय गवळी, बाळा पवार, पंडित जाधव, अमोल चौधरी, नीलेश चव्हाण, पप्पू पैलवान, बंटी तिवारी, दत्ता चौधरी, योगेश हिरे, बाबु पैलवान, दिलीप जैन याचप्रमाणे कुस्ती स्पर्धेला लागलेले पंच भरत नाईकल, गणपत चुमळे, पाळदे वस्ताद, जीवन शिंदे यांनी पंचाचे काम पाहिले.