चांदवडला शिवभोजन थाळीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:29 IST2020-04-16T18:28:32+5:302020-04-16T18:29:07+5:30
चांदवड - शासन शिव भोजन थाळी शुभारंभ संताजी मंगल कार्यालय वरचे गाव येथे करण्यात आला.

चांदवडला शिवभोजन थाळीस प्रारंभ
चांदवड - शासन शिव भोजन थाळी शुभारंभ संताजी मंगल कार्यालय वरचे गाव येथे करण्यात आला. रघुनाथ आहेर यांनी व्यवस्था केली व संताजी मंगल कार्यालय हे तेली पंच ट्रस्ट यांनी मोफत उपलब्ध करून दिले. थाळीचा लाभ गोरगरीब जनतेनी व गरजू ५० जणांनी घेतला. सदर शिवभोजन थाळी केंद्र हे नगरसेवक जगन्नाथ राऊत , चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी तहसीलदार प्रदीप पाटील, नितीन आहेर ,नगरसेवक पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व मुख्याधिकारी अभिजित कदम यांचेकडे पाठपुरावा करुन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरु होते. वरचेगावातील संताजी मंगल कार्यालयात सुरु करुन घेतले. यावेळी समाजसेवक महेश खंदारे, प्रभाकर खैरनार ,बाळा पाडवी ,विनोद सोनवणे,गुड्डू खैरनार, भाऊसाहेब जाधव, विकास जाधव, दत्तात्रय गुरव, सुहास निकुंभे, श्रीकांत सरोदे ,गणेश कुमावत, दीपक आहेर आदिनी सहकार्य केले.