कनकापूरच्या उपसरपंचपदी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:48 IST2020-02-03T16:47:29+5:302020-02-03T16:48:10+5:30
खर्डे : देवळा तालुक्यातील कनकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुषार शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

कनकापूरच्या उपसरपंचपदी तुषार शिंदे यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत करताना संजय बच्छाव, शिवाजी पवार, श्रावण पवार, संतोष शिंदे, माणिक शिंदे, जयदीप शिंदे, योगेश शिंदे, रवि शिंदे आदी.
ठळक मुद्देमावळत्या उपसरपंच विमल शिंदे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी सोमवारी (दि.३) सरपंच चंद्रकला गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
शिंदे यांनी सादर केलेल्या अर्जावर सूचक म्हणून श्रावण पवार यांनी स्वाक्षरी केली. यावेळी रूपाली शिंदे, ग्रामसेवक जयश्री आहेर आदींसह सदस्य उपस्थित होते.