शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच झाले अधिकारी

By admin | Updated: June 10, 2016 00:07 IST

मनपा सिडको विभागीय कार्यालयातील प्रकार

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोमहापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील जन्म-मृत्यू विगाभाची नोंद ठेवणाऱ्या अति महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या पाच महिन्यांपासून सहायक अधीक्षकच नसल्याने त्यांचे कामकाज हे शिपाई करीत आहे. महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात एक खिडकी, घरपट्टी, पाणीपट्टी, अतिक्रमण, विविध कर, भुयारी गटार आदि विभागांबरोबरच सिडको भागातील व्यक्तीचा जन्म झालेल्या व मृत्यू झालेल्यांची नोंद करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम जन्म-मूत्यू या विभागात होत असते. या विभागात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची गेल्या जानेवारी महिन्यात बदली झाली. यानंतर या ठिकाणी लगेच दुसरे अधीक्षक रुजू होण्याची गरज होती, परंतु यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही दुसरे कोणी अधिकारी आले नसल्याचे समजते. सहायक अधीक्षक जरी नसले तरी या विभागाचे काम मात्र थांबलेले नसल्याचे दिसून येत आहे. परंतु जन्म व मूत्यू झालेल्यांची नोंद ही योग्य पद्धतीने झाली आहे ंिकंवा नाही याबाबत लिपिकांनी घेतलेल्या नोंदी तपासून शहानिशा करण्यासाठी याठिकाणी सहायक अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून हे कामकाज याठिकाणी काम करणारे शिपाई, कर्मचारी हे त्यांचे काम करण्याबरोबरच सहायक अधीक्षकांचीही कामे करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अर्थात शिपाई जर सहायक अधीक्षकांचीही कामे बघत असेल व यात काही चूक झाल्यास यास कोण जबाबदार राहील याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या विभागात दोन लिपिक, चार शिपाई कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. इतर विभागाच्या तुलनेत या विभागाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असतानाही शिपाई करीत आहे. या विभागाबरोबरच एक खिडकी विभागातही लिपिकांच्या जागेवर महिला शिपाईच कामकाज करीत असल्याचे दिसून येते.