शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:58 IST

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नद्यांना गटारीचे स्वरुपउपनद्या ही गोदामाईची ताकदकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावणारी गोदावरी नदी भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. दुर्दैवाने या नदीच्या उगमस्थानाजवळच धरणे बांधली गेली. त्यामुळे तीचा मूळ नैसर्गिक स्वभाव आणि रचना विस्कळीत झाली. गोदामाईला पुनर्जिवित करण्यासाठी ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जिवीत नदी’ संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी केले.

निमित्त होते, नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात मंगळवारी (दि.४) दुपारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘नदी प्रदूषण : नागरिकांचा सहभाग’ या विषयावर देशपांडे यांनी या महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपिठावर परमिंदर सिंग, प्राचार्य निळकंठ निकम, किर्लोस्करचे मकरंद देवधर, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किरण रहाळकर उपस्थित होते.

मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नव्हे तर जगभरातील नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त होत आहे, याबाबत देशपांडे यांनी चर्चा केली. नाशिककरांनी गोदा फेस्टीव्हल’ची मुहूर्तमेढ रोवल्यास तरुणाई अधिकाधिक आकर्षित होईल. या फेस्टच्या माध्यमातून गोदावरी शिवार फेरी, विषारीद्रव्य मुक्त जीवनशैली, छायाचित्र प्रदर्शन, गोदा दत्तक उपक्रमाद्वारे पुरक अशी कृतीशील चळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नाशिककर दैनंदिन कामांमधून २२ ते ४० ग्रॅमपर्यंत केमिकल्सचा वापर दररोज करतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाण्याच्या माध्यमातून हजारो किलो विषारी द्रव्य दररोज मिसळतात, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.उपनद्या ही गोदामाईची ताकदगोदावरी नदीचे मुख्य वैशिष्टय आणि ताकद ही तीच्या उपनद्या आहेत. या नदीला मोठ्या संख्येने उपनद्या मिळतात. उगमापासून आळंदी उपनदी, नासर्डी, दारणा, बाणगंगा, प्रवरा, कादवा, मंजिरा, पुर्णा या मुख्य उपनद्या गोदावरीला थेट औरंगाबादपर्यंत येऊन मिळतात. यामुळे या नदीचा विस्तारदेखील मोठा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नदीची व्याख्याच प्रशासनाकडे नसल्यामुळे सगळे आराखडे, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वीNashikनाशिकenvironmentवातावरणgodavariगोदावरी