अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 06:54 PM2021-03-06T18:54:03+5:302021-03-06T18:54:53+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घेऊन आपल्या मेंढ्यांची पोटाची खळगी भरत आहे.

Shepherds roam in search of food and water | अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती

अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळाची भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देविहिरीतुन पाणी ओढून मेंढ्यांची तहान भागवी लागत आहे.

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने आपल्या मेंढ्यांची तहान भुक भागविण्यासाठी मेढपाळ रोनोमाळ फिरत आहेत. अन्न पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळ हे या शेतातुन त्या शेतात बसण्यासाठी रोनोमाळ धाव घेऊन आपल्या मेंढ्यांची पोटाची खळगी भरत आहे.
                           बऱ्याच ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने रानावनात असलेल्या विहिरीतुन पाणी ओढून मेंढ्यांची तहान भागवी लागत आहे. येवला तालुक्याच्या सर्वात डोंगराळ भागात असलेल्या राजापूर व परिसरात असलेले छोटे-मोठे बंधारे सध्या कोरडे पडले असल्याने जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मार्च महिना सुरू झाला असल्याने कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर शेतकऱ्यांना फक्त पिण्याचे पाणी शिल्लक आहे.

मेंढपाळासह प्राणी पक्षी हे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मेंढ्याना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसेल त्या शेतात मेंढपाळ बसत नाही व पुढे दुसऱ्या शेतात वाटचाल करत आहे. राजापूर व परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या पाण्यावर असलेला कांदा काढणी सूरु आहे. तेथे मेंढपाळ वर्ग आपल्या मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहे व दुपारी कडक उन्हात फिरून मेंढ्या दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेत आहेत.

उन्हाचा सावलीचा आधार घेतांना मेंढ्या.

Web Title: Shepherds roam in search of food and water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.