शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

कांदा रोपाच्या शेतात सोडल्या मेंढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 3:15 PM

ब्राह्मणगाव : उन्हाळी कांदा भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यातच लाल कांद्यालाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या रोपांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सोडून देत आपला संताप व्यक्त केला.

ब्राह्मणगाव : उन्हाळी कांदा भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यातच लाल कांद्यालाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या रोपांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सोडून देत आपला संताप व्यक्त केला.कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी आठ ते दहा महिने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला. एवढा कांदा साठवूनही त्यास अत्यल्प भाव मिळत असल्याने हा कांदा आता अजून किती दिवस साठवून ठेवावा या विवंचनेत शेतकरी असून त्यातच लाल कांद्याची आवक वाढल्याने व पुन्हा भाव खूपच कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याचा लागवडीचा खर्च ही निघत नाही, कांद्यालाच काय पण शेती पिकांमध्ये कुठल्याच पिकाला भाव नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. येथील कांदा उत्पादक भाऊसाहेब हिरे यांनी आपल्या शेतातील कांदा रोपांच्या शेतात मेंढ्यांना चारायला सोडत संताप व्यक्त केला आहे. कांदा हे शेतकºयांचे नगदी पीक आहे. त्यात दोन पैसे भेटले तर शेतकरी मुलांचे लग्न, शिक्षण , दवाखाना, वीज बिल , शेती कर्ज देऊ शकेल, मात्र कांद्याला व अन्य पिकांना भावच नसल्याने त्यातच पुन्ह पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाने घेरले आहे. शेतीला पाणी, जनावरांना चारा , कुटुंबाला आर्थिक आधार या सर्व संकटांवर कशी मात करावी कांदा उत्पादकांनी पंतप्रधान कार्यालयाला कांदा विक्र ीची रक्कम मनी आॅर्डर करूनही काहीच दखल केंद्र किंवा राज्य सरकार घेत नसल्याने शेतकºयांनी आता संताप व्यक्त करत कांदा पिकात व कांदा रोपांचे शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक