बेलू परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, वासरू फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:10 IST2018-11-19T15:10:35+5:302018-11-19T15:10:50+5:30

सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून एकाच आठवड्यात दोन शेळ्यांसह वासरू फस्त केले आहे. येथील बेंद मळा परिसरात चार-पाच दिवसांपूर्वी पांडू शिवराम तुपे यांच्या पडवीत बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार तर एक जखमी झाली.

 Sheep, calf fatty in leopard attack in Belu area | बेलू परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, वासरू फस्त

बेलू परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, वासरू फस्त

ठळक मुद्दे आमराई मळ्यातील शिवराम दगू तुपे यांच्याही वासरावर बिबट्याने हल्ला करून घरासमोरील भाताच्या शेतात फस्त केले.


सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून एकाच आठवड्यात दोन शेळ्यांसह वासरू फस्त केले आहे.
येथील बेंद मळा परिसरात चार-पाच दिवसांपूर्वी पांडू शिवराम तुपे यांच्या पडवीत बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार तर एक जखमी झाली. तसेच आमराई मळ्यातील शिवराम दगू तुपे यांच्याही वासरावर बिबट्याने हल्ला करून घरासमोरील भाताच्या शेतात फस्त केले. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

Web Title:  Sheep, calf fatty in leopard attack in Belu area