कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:52 PM2020-09-25T23:52:44+5:302020-09-26T00:50:40+5:30

नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या कर्तव्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सलाम केला आहे.

She performed her duty by making her way through so much water in the room | कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य

कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य

Next

नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्याने भरलेल्या नदीतून वाट काढत आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या कर्तव्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सलाम केला आहे.
गेली सहा महिने या आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कोविड सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत. कोरानाची साथ सर्व ठिकाणी चालू असताना नाशिक जिल्'ामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत आहेत. केवळ कोविडचे काम न करता नियमित लसीकरण, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात सेवा अविरतपणे देत आहेत. नाशिक जिल्'ातील मालेगाव शहर व ग्रामीण भागामध्ये अर्धवार्षिक पल्स पोलिओ मोहिम 20 सप्टेंबर रोजी राबविण्यात आली जी बालके लस घेण्यासाठी बुथवर येऊ शकली नाही त्यांना घरी जाऊन पोलिओ लस देण्याचे काम सध्या सुरू आहे. मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कर्मचारी मालुताई अहिरे यांनी नदीमध्ये तुडुंब पाणी असताना आवश्यक आरोग्यविषयक साहित्य घेवून बालकांना पोलिओचा डोस देण्याचे काम केले आहे. दरम्यान, नदीतून कमरे इतक्या पाण्यातून वाट काढतानाचे त्यांचे छायाचित्रे समाज माध्यमातून व्हारल होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे.

यंत्रणेचे काम प्रेरणादायी
नाशिक जिल्हयाच्या प्रत्येक खेडया-पाडयात प्रत्येक घरासमोर जाऊन 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सर्वेक्षण सुरु आहे. कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता याचे लोकशिक्षण देऊन आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. आपले नियमित काम सांभाळून हे कर्मचारी समाजासाठी आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत आहेत. या सर्वांचे काम प्रेरणादायी असून बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी पाण्यातून वाट काढून कर्तव्य बजावणा-या मालेगाव तालुक्यातील आशा कर्मचारी चा जिल्हा परिषदेला अभिमान आहे.
- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी
 
Web Title: She performed her duty by making her way through so much water in the room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.