बिबट्याच्या हल्ल्यात श्वानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:04 IST2019-11-17T19:03:50+5:302019-11-17T19:04:57+5:30
दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार झाले आहे. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात श्वानाचा मृत्यू
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात श्वान ठार झाले आहे. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. आंबेवणी येथील शशिकांत देवराम सवंद्रे यांनी रॉटव्हिलर जातीचे श्वान घराजवळ बांधले होते.
रात्रीच्या सुमारास बिबट्याने या श्वानावर हल्ला केला. सकाळी ही घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती देऊनही सायंकाळपर्यंत एकही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी भेट न दिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. आंबेवणी, वरखेडा, घोडेवाडी, परमोरी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस कृष्णा मातेरे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.