श्रमेव जयते...

By किरण अग्रवाल | Published: April 29, 2018 01:59 PM2018-04-29T13:59:36+5:302018-04-29T13:59:36+5:30

एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो.

Sharmav Jayate ... | श्रमेव जयते...

श्रमेव जयते...

googlenewsNext
ठळक मुद्दे मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते.जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात.वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही.

सर्वच बाबतीत केवळ शासनावर विसंबून राहणे योग्य ठरणारे नाही. विकासाच्या बाबतीत किंवा कसल्याही समस्येच्या निराकरणासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत सरकार प्रयत्नशील असतेच, पण सरकारी प्रयत्नाला लोकसहभागाची साथ लाभली तर चित्र झपाट्याने बदलता येते. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटना व पानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांकडे याचदृष्टीने पाहता येणारे आहे.
एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. मैलोन्मैल डोक्यावर हंडे-गुंडे घेऊन त्यांना पायपीट करावी लागते. उन्हाचा चटका व दुष्काळातील होरपळ काय असते हे खरेतर या माय-भगिनींना विचारायला हवे. जिल्ह्यातील सिन्नर व चांदवडसारखे तालुके तर कायम दुष्काळी असतात. वर्षोन्वर्ष तेथे शासकीय योजना राबविल्या जातात. पण टंचाई काही दूर होत नाही. म्हणूनच प्रख्यात समाजसेवी शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वातील भारतीय जैन संघटना व अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाउंडेशनने या दोन्ही तालुक्यांतील शंभरपेक्षा अधिक गावांमध्ये पाणी अडविण्यासाठी व ते जमिनीत जीरवण्यासाठी श्रमदानातून अनेकविध कामे हाती घेतली आहेत. दुष्काळातील होरपळमुळे डोळ्यात पाणी येते हे खरे, पण आता डोळ्यात पाणी आणायचे नाही, तर गावात पाणी आणायचे; असा निर्धार करून गावकरी या अभियानात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह त्यांची यंत्रणाही यात हिरीरीने सहभागी झालेली दिसत आहे. एरव्ही तटस्थ राहणाऱ्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशही या मोहिमेत सहभागी झालेले दिसून आले. अनेक नोकरदार कामाच्या ठिकाणी रजा टाकून, तर श्रमिक वर्ग मोलमजुरीला न जाता श्रमदान करीत आहेत. जणू जागोजागी गावशिवारात श्रमदानाचे तुफानच आले आहे. आपले गाव पाणीदार व्हावे, टॅँकरमुक्ती साधावी म्हणून हे श्रमदान सुरू आहे. यातील संबंधितांची सामाजिक जाणीव महत्त्वाची असून, त्यामुळेच श्रमदानाला गावक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे जो इतरांसाठी प्रेरक ठरला आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत हे तुफान आले असले तरी ‘श्रमेव जयते’चाच आदर्श त्यातून घडून येत आहे. म्हणून त्यासाठी पुढाकार घेणाºया जैन संघटना व पानी फाउंडेशनचे तर कौतुक करावे तेवढे थोडे आहेच, पण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आलेल्या ग्रामस्थांचा या मोहिमेतील अनुकरणीय सहभाग विशेष गौरवास्पद आहे. सामाजिक जाणिवांचे हे तुफान चांदवड व सिन्नर तालुक्यांखेरीज अन्यही तालुक्यात घोंगावावे आणि त्यासाठी अन्य स्थानिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा एवढेच यानिमित्ताने.

Web Title: Sharmav Jayate ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.