शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शरणपूररोडवर तरुणास बेदम मारहाण करून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:47 IST

पादचारी युवकास रस्त्यात अडवून चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़ निखिल यादव पाटील (२३, रा. निर्जल अपा. कॅनडा कॉर्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़

नाशिक : पादचारी युवकास रस्त्यात अडवून चौघा संशयितांनी बेदम मारहाण करून लुटल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास कुलकर्णी गार्डन परिसरात घडली़ निखिल यादव पाटील (२३, रा. निर्जल अपा. कॅनडा कॉर्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल पाटील हा रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनकडून कॅनडा कॉर्नरकडे पायी जात होता़ यावेळी पॅनासोनिक शोरूम शेजारील शॉपिंग सेंटरजवळ चौघा संशयितांनी त्यास अडविले़ यानंतर चौघांनी निखिल याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाइल व दोन हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़युवकावर चाकूने हल्लारागाने का पाहतो, असा जाब विचारणाऱ्या युवकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी (दि़१६) रात्री मोठा राजवाडा परिसरात घडली़ जय विजय काळे (२३, रा. मोठा राजवाडा) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास जय काळे मोठा राजवाड्यातील डॉ. सुभाष काळे यांच्या घराच्या ओट्यावर बसलेला होता़ त्याच्याकडे संशयित आयुष साळवे याने रागाने पाहिल्याने जयने माझ्याकडे रागाने का बघतोस, अशी विचारणा केली़ याचा राग आलेल्या आयुषने साथीदार यश साळवे, रोहन रोकडे व सिद्धार्थ दोंदे यांना आवाज देऊन बोलावून घेत जयला बेदम मारहाण केली. संशयित आयुष, यश व रोहन यांनी जयला पकडून ठेवले तर सिद्धार्थ दोंदे याने चाकूने वार केले़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़त्र्यंबकेश्वरच्या युवकास मारहाणत्र्यंबकेश्वर येथील तरुणास चौघा संशयितांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास मुंबई नाक्यावरील संदीप हॉटेलजवळ घडली़ अजय उत्तम डेगळे (रा. आंबेडकरनगर, त्र्यंबकेश्वर, नाशिक) असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अजय डगळे हा मुंबई नाक्यावरील संदीप हॉटेलजवळून मारुती व्हॅन (एमएच १५, ईबी १९४०) घेऊन जात होता़ त्यास सिग्नलजवळ मेहुणे अशोक मोरे हे भेटल्याने त्यांना संदीप हॉटेलजवळ सोडले़ यानंतर गाडी बाजूला लावून लघुशंका करून परतत असताना संशयित किरण सुभाष भामरे, भूषण चव्हाण व त्यांचे दोन साथीदार अशा चौघांनी अडवून कारण नसताना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़काठेगल्लीत महिलेचा विनयभंगवाºयाने झाडाची फांदी अंगणात पडल्याच्या कारणातून महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास काठेगल्लीत घडली़ या प्रकरणी संशयित विक्की श्यामसुंदर मराळकर (२८ रा. नावीन्य सोसायटी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात ला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाºयाने झाडाची फांदी संशयित मराळकर याच्या घरासमोर पडली़ मात्र, माझ्या घरासमोर फांदी का टाकली यावरून वाद घालत मराळकर यांनी महिलेस शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरातून मोबाइलची चोरीउघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी मोबाइल चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१७) सकाळी रविवार कारंजावरील कुटु लेनमध्ये घडली़ रिमझिम वाडा येथील रहिवासी गौरव जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सकाळच्या सुमारास कामात व्यस्त असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून टीव्हीसमोर ठेवलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चॉपरचा धाक दाखवून खंडणीची मागणीचॉपरचा धाक दाखवून तिघा संशयितांनी दुचाकीचालकाकडे पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना शनिवारी (दि़१६) जेलरोडवरील नोट प्रेसजवळ घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील गिडप्पा चाफळकर (४४, रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) हे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते़ सुनील चाफळकर हे पेंढारकर कॉलनीतून जात असताना संशयित बाळा ऊर्फ विजय टिळक उदैनकर, बाळा कदम (दोघे रा. कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) व सचिन धोत्रे (रा. कस्तुरबानगर, वेद मंदिराजवळ, नाशिक) यांनी चाफळकर यांची दुचाकी अडविली. यानंतर चॉपर दाखवून त्यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची खंडणी मागितली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय