नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार आज नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:49 IST2019-11-01T01:49:38+5:302019-11-01T01:49:54+5:30
नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा शुक्रवारी (दि.१) दौरा करणार आहेत.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार आज नाशकात
नाशिक : परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा शुक्रवारी (दि.१) दौरा करणार आहेत. पावसामुळे द्राक्ष, सोयाबीन, मका यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार हे शुक्रवारी दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईहून निघून दुपारी बारा वाजता त्यांचे घोटीत आगमन होईल. तेथे ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तेथून शहरात त्यांचे आगमन होईल. दुपारी ते कळवणकडे रवाना होतील आणि नांदुरी येथे पोहोचतील. येथील सोयाबीन फार्मला भेटीबरोबरच अन्य क्षेत्राची पाहणी करून नंतर ते पिंपळवाडे येथे भेट देतील. द्राक्षाच्या नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देतील.