शरद पवार नाशकात दाखल
By Admin | Updated: April 11, 2015 00:00 IST2015-04-11T00:00:53+5:302015-04-11T00:00:54+5:30
शरद पवार नाशकात दाखल

शरद पवार नाशकात दाखल
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार हे काल (दि. १०) दुपारी नाशिकमध्ये दाखल झाले. वनाधिपती विनायक पाटील यांच्या घरी पवार दोन दिवस मुक्कामी असून, उद्या (दि.११) त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी पवार यांचे सातपूरला विनायक पाटील यांच्या घरी आगमन झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माधवराव पाटील, माजी आमदार दिलीप बनकर, उत्तम भालेराव, माजी जि. प. अध्यक्ष जयश्री पवार, जि. प. सदस्य डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, श्रीराम शेटे, राजेंद्र ढगे, भास्कर भगरे, आदिंनी पवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. शनिवारी (दि.११) सकाळी दहा ते साडेअकरा वाजेदरम्यान ते राष्ट्रवादी भवन कार्यालयात थांबून शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ते पत्रकारांशी वार्तालाप करणार असून, त्यानंतर चार वाजता गोल्फ क्लब मैदानावरील छायाचित्राचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, रात्री मुक्काम करून रविवारी सकाळी ते मुंबईकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)