शरद पवार माझा बापच, पतीच्या विरोधातील गुन्ह्यानंतर चित्राताईंना साहेबांची आठवण

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 02:46 PM2021-02-27T14:46:50+5:302021-02-27T14:48:17+5:30

चित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar is my father, says Chitra Wagh from the case against her husband ... | शरद पवार माझा बापच, पतीच्या विरोधातील गुन्ह्यानंतर चित्राताईंना साहेबांची आठवण

शरद पवार माझा बापच, पतीच्या विरोधातील गुन्ह्यानंतर चित्राताईंना साहेबांची आठवण

Next
ठळक मुद्देचित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासमोरील अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. (Unaccounted property case) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत. (ACB files case against Chitra Wagh's husband Kishor Wagh). त्यासंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यासोबतच्या याप्रकरणातील आठवणी जागवल्या. 

चित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.

पत्रकारांचे आज सकाळी फोन आल्यावर आश्चर्य वाटलं, कारण मला अद्यापही माहिती नाही. एसीबीच्या चौकशीसाठी माझ्या नवऱ्याला घरी येऊन हँड डिलिव्हरी कॉपी दिली, आता तुमच्याकडची माणसं संपली का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना विचारला. तसेच, आज मला पवारसाहेबांची आठवण येत असल्याचं त्यांनी म्हटलं. साहेब, मला आज सकाळपासून तुमची आठवण येतेय. 5 जुलै 2017 रोजी हा गुन्हा दाखल झाला, आणि 7 जुलै रोजी मी पवार साहेबांना भेटायला गेले होते. मी सिल्व्हर ओकवर होते, माझा बापच आहे. मी एफआयआरची कॉपी दिली, त्यांनी वाचली अन् मला सांगितलं. चित्रा, यामध्ये तुझा नवरा कुठंच नाही. त्यानंतरही, केस उभी राहिली. अद्यापही कोर्टात केस सुरू आहे. पण, माझा नवरा तिथे नव्हतात, त्यांनी पैसे घेतलेच नाहीत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी एसीबीकडून सुरू असलेल्या त्यांच्या पतीविरोधातील केससंदर्भात आपली भूमिका मांडली. तसेच, अद्यापही पूजा चव्हाण प्रकरणात एफआयआर का नाही? असा सवालही त्यांनी विचारला. 

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.  किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. 

दरम्यान, या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमभ भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात. या प्रकरणात भाजपा हा चित्रा वाघ यांच्यासोबत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.
 

Web Title: Sharad Pawar is my father, says Chitra Wagh from the case against her husband ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.