शेनवड सरपंचपदी दिवटे

By Admin | Updated: June 27, 2014 00:13 IST2014-06-26T22:03:10+5:302014-06-27T00:13:47+5:30

शेनवड सरपंचपदी दिवटे

Shanwad sarpanchapi day | शेनवड सरपंचपदी दिवटे

शेनवड सरपंचपदी दिवटे

 शेनवड बु. (ता. इगतपुरी) : येथील ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवड प्रक्रि येत सरपंच पदासाठी माजी सरपंच चंद्रकला दिवटे यांचा व उपसरपंच पदासाठी कैलास कडू यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुक मागील महिन्यात पार पडली होती. या महिन्यात कार्यकाल संपुष्टात येत असल्याने सरपंच आणि उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुक निर्णय अधिकारी एन.डी.बाहिकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक गावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या निवड प्रक्रियेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी दिवटे व कडू यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात
आली.
दरम्यान, निवडीनंतर नवनिर्वाचितांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी कालू दिवटे, भास्कर सोनवने, अनिल भोपे, लहू गिळन्दे, दसा गिळन्दे, कमलू खडके, श्रीरंग शिंदे, मुक्तिराम कोकाटे, बबलू शिंदे आदि उपस्थित होते.

Web Title: Shanwad sarpanchapi day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.