देवळ्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:10 IST2019-01-22T16:09:47+5:302019-01-22T16:10:38+5:30

धार्मिक कार्यक्रम : भागवत पुराणावर प्रवचनमाला

Shakambhari Purnima festival in the temple | देवळ्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव

देवळ्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव

ठळक मुद्दे ह्या वर्षी दि. १४ ते २१ जानेवारी ह्या कालावधीत उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, भागवत कथा आदी कार्यक्र म झाले.

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्र माच्या सांगता प्रसंगी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या,व भाजीपाला एकत्र करून तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
गुरूमाउली स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून २३ वर्षांपूर्वी दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आल्यानंतर दरवर्षी तो नियमितपणे साजरा केला जात आहे. ह्या वर्षी दि. १४ ते २१ जानेवारी ह्या कालावधीत उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, भागवत कथा आदी कार्यक्र म झाले. कु. अनुराधा दिदी यांनी उत्सव काळात नित्यनियमाने सायंकाळी साडेसात ते अकरा हया वेळेत भागवत पुराणावर प्रवचन दिले. यावेळी पंचक्र ोशीतील भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यावेळी स्व. शिवानंद महाराज यांची पत्नी श्रीमती शकुंतला ताई पाटील, दिपक पाटील यांना सत्संग सेवा समितीच्यावतीने सन्मानित करण्यात आले. दिनेशिगरी महाराज यांच्या प्रवचनाने उत्सवाची सांगता करण्यात आली. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समितीच्यावतीने करण्यात आले होते.
१२५ भाजी-कंदमुळांचा महाप्रसाद
यावेळी वराह कंद, नवल कंद, बांबू कंद, कमळ कंद, चंदन वाटवा, चांदणी वेल, रूद्राक्ष, फणस, पुनर्नवा, राजहंस, कुशमाडा, केतकी फुल, काचीन फुल आदी दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या, व भाज्यांसह १२५ प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकत्रित भाजी करण्यात आली होती. ह्या तयार केलेल्या महाप्रसादाचा लाभ  हजारो नागरिकांनी घेतला. देवळा येथे शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव त्याच्या विशिष्ठ पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या महाप्रसादामुळे सर्वदूर प्रसिद्ध असून जिल्हाभरातून असंख्य भाविक हया उत्सवाला हजेरी लावतात.

Web Title: Shakambhari Purnima festival in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक