सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी शैलेश नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:26 IST2018-03-22T23:26:27+5:302018-03-22T23:26:27+5:30
सिन्नर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे शैलेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी शैलेश नाईक
सिन्नर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे शैलेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रमोद चोथवे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी तहसीलदार नितीन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी शैलेश नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे यांनी तर अनुमनोदक म्हणून मावळते उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांनी स्वाक्षरी केली होती. छाननी झाल्यानंतर तहसीलदार गवळी यांनी नाईक यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. बैठकीस नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक गोविंद लोखंडे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, श्रीकांत जाधव, रुपेश मुठे, ज्योती वामने, सुजाता तेलंग, सुजाता भगत, गीता वरंदळ, निरूपमा शिंदे, प्रणाली गोळेसर, नलिनी गाडे, प्रीती वायचळे, विजया बर्डे, सिंधू गोजरे, सोमनाथ पावसे, सुहास गोजरे, शीतल कानडी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, दीप्ती वाजे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, व्ही.एन. नाईक संस्थेचे संचालक हेमंत नाईक, सोमनाथ वाघ, बाळासाहेब चकोर, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सुनील चकोर, देवीदास वाजे यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत उपनगराध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केले.