नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण म्हणून ओळखला जाणारा ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे; मात्र यंदा कोरोनासारख्या भयंकर आजाराचे सावट ईदवर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदानावर होणारा ईदच्या खास नमाजपठणाच्या पारंपरिक सोहळा यंदा पहावयास मिळणार नाही. कारण केंद्र व राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव रद्द करण्याचे आदेश येत्या ३१ तारखेपर्यंत देण्यात आले आहेत.कोरोना आजाराच्या संकटामुळे संपुर्ण रमजान पर्व यंदा जेमतेम उत्साहात पार पडले. बाजारपेठा फारशा गजबजलेल्या दिसल्या नाहीत. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मागील दीड महिन्यांपासून ‘लॉकडाउन’ घोषित केले गेले आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी राज्यासह देशभरात वाढविला गेला आहे. येत्या २४ मे रोजी मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची सांगता होणार आहे. २५ तारखेला सोमवारी रमजान ईद साजरी केली जाईल. तत्पुर्वी २३ तारखेला रमजानच्या २९ व्या उपवासाच्या संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याची अधिकृत घोषणा झाली तर कदाचित रविवारी (दि.२४) रमजान ईद साजरी केली जाऊ शकते.एकूणच रमजान ईदचा मोठा सण अवघ्या पाच ते सहा दिवसांवर आला आहे; मात्र यावर्षी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह प्रमुख धर्मगुरू व उलेमांनीदेखील ईद यंदा अगदी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ज्याप्रमाणे रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.
...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:16 IST
रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे.
...यंदा शहाजहांनी ईदगाह गजबजणार नाही
ठळक मुद्देनमाजपठणाचा सामुहिक सोहळा रद्दगर्दी टाळा, कोरोनाला संपवा