शाहीर उत्तम गायकर स्वामी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:47 IST2019-08-03T15:46:52+5:302019-08-03T15:47:09+5:30
अपंग गरजू रु ग्णांना साहित्य वाटप

शाहीर उत्तम गायकर स्वामी पुरस्काराने सन्मानित
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गीतकार, निवेदक आणि शाहीर उत्तम गायकर यांना स्वामी समर्थ मंडळ आणि जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वामी गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण व सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्वामी समर्थ मंडळ व जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी गौरव पुरस्कार सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग गरजू रु ग्णांना साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंदतरंग लोककला पथकाच्या माध्यमातून लोककला तळागाळात पोहोचविणारे शाहीर उत्तम गायकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार निर्मला गावीत, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, तहसीलदार वंदना खरमाळे ,पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, इगतपुरीचे नगरसेवक संपत डावखर, घोटी मर्चंट बॅँकेचे अध्यक्ष विजय सिंघवी,हेडगेवार पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश चोप्रा, यशवंत वालझाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.