शहीद जवान गोसावी कुटुंबियांना मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:43 IST2018-11-22T17:43:02+5:302018-11-22T17:43:15+5:30

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास विविध संस्था व सामजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

Shaheed Jawan Gosavi's help to families | शहीद जवान गोसावी कुटुंबियांना मदतीचा ओघ

शहीद जवान गोसावी कुटुंबियांना मदतीचा ओघ

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास विविध संस्था व सामजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यावतीने २५ हजार रूपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, संचालक विनायक घुमरे, रवींद्र पगार, संजय खैरनार, पंढरीनाथ खैरनार, सोपान उगले, सचिव विजय विखे, सहसचिव आर. एन. जाधव, शांताराम कोकाटे, सोपान हांडोरे, संदीप हांडोरे, दिलीप हांडोरे यांनी शिंदेवाडी येथे जावून गोसावी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर २५ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

Web Title: Shaheed Jawan Gosavi's help to families