शिवजयंती अध्यक्षपदी सावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:21+5:302021-02-05T05:39:21+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळात बारा बुलतेदारांची नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे या समितीमध्ये सर्व समाज समावेशक निवड करण्यात ...

शिवजयंती अध्यक्षपदी सावळे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळात बारा बुलतेदारांची नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे या समितीमध्ये सर्व समाज समावेशक निवड करण्यात आली आहे. हॉटेल मसाला झोन येथे आयोजित बैठकीत नगरसेवक योगेश शेवरे यांनी बिनाराजकीय असलेल्या गंगाराम सावळे यांची अध्यक्षपदासाठी नाव सुचविले. हिरामण रोकडे यांनी अनुमोदन दिल्याने सावळे यांची एकमताने निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदासाठी विक्रम नागरे यांनी कांता निलेश शेवरे यांचे नाव सुचविले. दीपक लोंढे यांनी अनुमोदन दिल्याने त्यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक सलीम शेख, समितीचे मावळते अध्यक्ष किशोर निकम, माजी अध्यक्ष नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, खजिनदार जीवन रायते तसेच करण गायकर,दिनकर कंडेकर, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, गौरव जाधव, लोकेश गवळी, संजय राऊत, समाधान देवरे, अनिल गडाख,राजू पाटील, वैभव ढिकले, योगेश गांगुर्डे, देवा जाधव, दीपक वाघचौरे, कैलास गांगुर्डे, मुन्ना तुपे, किरण बढे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो २५ शेवरे, सावळे)