शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

By Admin | Updated: August 6, 2014 01:57 IST2014-08-06T01:53:26+5:302014-08-06T01:57:19+5:30

शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

Shadow soil Ganesh idol workshop activities | शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

शाडू माती गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रम

 

सातपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, तसेच नदीचे होणारे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने बॉश कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सामाजिक जबाबदारी अंतर्गत कंपनीतील कर्मचारी आणि कुटुंबीयांसाठी आयोजित शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण, वाहनांची पीयूसी तपासणी यांसह विविध उपक्रमांत कर्मचारी आणि व्यवस्थापनाचा सहभाग आहे. नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मागील वर्षापासून कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कंपनीच्या आवारातच शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी ८५ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या उपक्रमात सहभागी झाले होते. यावर्षीदेखील अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत १५१ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झालेत. या कार्यशाळेत सहभागी झालेले कर्मचारी आता समाजात शाडू मातीच्या गणेशमूर्तीसाठी आग्रही झाले आहेत.
तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी बॉश स्वयंसेवक कार्यरत राहणार असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. मूर्तिकार शांताराम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. (वार्ताहर)

Web Title: Shadow soil Ganesh idol workshop activities