शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘सावळे सुंदर रूप मनोहर...’ अभंग संध्या रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:10 IST

आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना दिली.

ठळक मुद्देआषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे मैफल

नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरापासून प्रारंभ झालेले स्वर ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ असे नाचत-बागडत आले अन् ‘सावळे सुंदर रूप मनोहर’अशी लडीवाळ वळणे घेत ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’पर्यंत सर्व वातावरण विठ्ठलमय करून गेले.आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना दिली.तेराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, संत पुरंदर दासानंद, संत हरिदास, संत जगन्नाथ दास यांनी विठ्ठलाला अर्पण केलेले असंख्य अभंग वेगवेगळ्या पद्धतीने रचले. त्या रचनांमधील भक्तिरस आणि त्यांना अवीट चाल आणि सुरेल गळ्यांमधून ऐकण्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. व्यंकटेश यांनी ‘आलीया संसार उठा वेगे करू, ये गं ये गं विठाबाई ’आणि कानडी संत जगन्नाथ दास आणि संत हरिदासांच्या रचना सादर करीत दाद मिळवली. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘एकदा पंढरी पहावी, सावळे सुंदर, अगा वैकुंठीच्या राया, पंढरीचे भूत मोठे आणि कानडा राजा पंढरीचा’ यांसह अन्य भक्तिगीते सादर करीत प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घातले.तर सावनीने ‘रामरंगी रंगले, मायबाप केवळ काशी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ ही गिते सादर केली. प्रमुख गायकांना सहकलाकार प्रसाद पाध्ये (तबला), प्रताप आव्हाड (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (साईड ºिहदम), आदित्य ओक (संवादिनी), एस. आकाश (बासरी), नरेंद्र नायक (संवादिनी) यांची सुमधुर साथ लाभली. गेयता व्यास यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक