अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST2021-04-04T04:14:48+5:302021-04-04T04:14:48+5:30

नाशिक : अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत ४३ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना पखालरोड भागात घडली. पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या ...

Sexual abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नाशिक : अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत ४३ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना पखालरोड भागात घडली. पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल कादीर शहा (रा.आयफा हाईटस, पखाल रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

संशयित शहा याने एका १५ वर्षीय मुलीला काहीतरी आमिष दाखवून त्याच्या घरात बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करीत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीला दमदाटी करीत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी घाबरलेली होती. तिने काही दिवस उलटल्यानंतर धाडसाने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी शहाच्या विरुद्ध पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of a minor girl