मालेगाव : तालुक्यातील गारेगाव येथे नात्याने वडील असलेल्या रामदास गुलाब जाधव याने त्याच्या बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने वडनेर खाकुर्डी पोलिसांत दिली आहे. गेल्या बुधवारी (दि.१५) रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास गारेगावी ही घटना घडली. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.
गारेगावी बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:15 IST