सातपूरला मारहाणीत एक गंभीर जखमी

By Admin | Updated: September 12, 2014 00:38 IST2014-09-12T00:38:37+5:302014-09-12T00:38:37+5:30

सातपूरला मारहाणीत एक गंभीर जखमी

Severe injured in Satpur | सातपूरला मारहाणीत एक गंभीर जखमी

सातपूरला मारहाणीत एक गंभीर जखमी


नाशिक : सातपूर येथील श्रमिकनगरमधील पार्थ पॅलेससमोर बुधवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित प्रसाद वेल्हाड यास ताब्यात घेतले आहे. अक्षय युवराज पाटील (१९) याने माझा भाऊ सागर यास तू मारहाण का केली, अशी विचारणा प्रसाद यास केली असता त्याने जवळील धारदार शस्त्राने पाटील याच्या शरीरावर वार के ल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारहाणीत पाटील गंभीर जखमी झाला असून, त्याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित प्रसादला अटक के ली आहे.

Web Title: Severe injured in Satpur