ओझर परिसरात दोन दिवसात कोरोनाचे सतरा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:17 IST2020-07-25T23:16:52+5:302020-07-25T23:17:08+5:30
ओझर : ओझरसह परिसरात दोन दिवसात कोरोनाचे सतरा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एचएएल रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत ११४ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, ४९ रु ग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर ६१ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.

ओझर परिसरात दोन दिवसात कोरोनाचे सतरा रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : ओझरसह परिसरात दोन दिवसात कोरोनाचे सतरा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एचएएल रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत ११४ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, ४९ रु ग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत, तर ६१ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोन दिवसात ओझरसह परिसरातील सतरा जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एचएएल रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांसह ओझर टाऊनशिपमधील एकाच कुटुंबातील ९, शिवाजीनगरला १, टिळकनगर २ व साईधाम येथील १ रु ग्णाचा समावेश आहे. परिसरातील वाढत्या रु ग्णसंख्येमुळे ओझर, ओझरटाऊनशिपमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागातील यंत्रणेतर्फे या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येत आहे.