शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन एक्स्प्रेसचे सात टँकर्स आज नाशकात दाखल होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:17 IST

राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत.

ठळक मुद्देदिलासा : नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरणार साठा

नाशिक : राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत. गुरुवारी रात्री विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी सकाळी १० वाजता नाशिकरोड स्थानकात पोहोचणार आहे. या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्स नाशिकमध्ये उतरवले जाणार असून, त्याबाबतचे नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात सर्व महानगरांमध्ये करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. रेल्वेद्वारे महाराष्ट्रासाठी रोल ऑन रोल म्हणजे रोरो पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. नवी मुंबईच्या कळंबोली स्थानकातून १८ एप्रिलला रात्री ऑक्सिजन एक्स्प्रेस ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेली होती. आता या एक्स्प्रेसवरील ७ टँकर्समध्ये ऑक्सिजन भरण्यात आला असून, विशाखापट्टणमच्या स्टील प्लांटमध्ये ऑक्सिजनचे हे टँकर्स भरण्यात आले आहेत. ही एक्स्प्रेस विशाखापट्टणममधून रवाना झाली आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजेदरम्यान ही एक्स्प्रेस नागपुरात दाखल झाली. नाशिकला शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता ही एक्स्प्रेस पोहोचणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन वितरणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य शासनाच्या निर्देशानुसार  ऑक्सिजन कमतरता असलेल्या ठिकाणी हे टँकर्स पोहोचवले जाणार आहेत.काही प्रमाणात दिलासादायक ठरणारनाशिकमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून, अनेक खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेणेच अनेक रुग्णालयांनी थांबवले आहे. काही रुग्णालयातून तर रुग्ण इतरत्र हलविण्यात आले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्यामुळे तुटवडा भरून काढण्यात प्रशासनदेखील हतबल ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत येणारे ऑक्सिजन टँकर हे तुटवड्याची पूर्ण पूर्तता करू शकणार नसले तरी काही प्रमाणात तरी दिलासादायक ठरू शकणार आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकOxygen Cylinderऑक्सिजन