नाशिक : जिल्ह्यात मालेगाव मधील कोरोना बाधीतांची संख्या कमी होत असताना शहरात बाधीत आणि मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. सोमवारी (दि.१५) एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याशिवाय शहरात दिवसात भरात तब्बल ६५ रूग्णआढळल्याने बाधीतांच्या संख्येने सातशेचा टप्पा पार केला आहे. शहरात एकुण ७३८ रूग्ण आढळले आहे.शहरातील खोडेनगर, महादेववाडी, बुरूड गल्ली, पारिजात नगर, नाईकवाडीपुरा, खडकाळी, वडाळा या भागातील रूग्णांचे सोमवारी (दि.१५) मृत्यू झाले आहेत.नाशिक शहरात पहिला रूग्ण ५ एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असताना गेल्या मे महिन्याच्या मध्यानंतर मात्र शहरात रूग्ण वाढत गेली आणि आता तर ती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर गेलीआहे. शहरात दररोज किमान चाळीस ते पन्नास रूग्ण आढळत असून रूग्ण संख्या आणि मृत्यू दराच्या बाबतीत नाशिक शहराने मालेगावला मागे टाकले आहेत. शहरात दररोज एक किंवा दोन जणांचे कोरोनामुळे मृत्यू होत असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१२) एकाच दिवसात प्राप्त झालेल्या अहवालानुसार सात जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे नाशिक शहरात कोरोनामुळेमृत्यू झालेल्यांची संख्या ३९ झाली आहे. तर एकाच दिवसात ६५ बाधीत झाले असून त्यामुळे बाधीतांची संख्या ७३८ झाली आहे.
शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:20 IST
शहरातील खोडेनगर, महादेववाडी, बुरूड गल्ली, पारिजात नगर, नाईकवाडीपुरा, खडकाळी, वडाळा या भागातील रूग्णांचे सोमवारी (दि.१५) मृत्यू झाले आहेत.
शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू
ठळक मुद्देएकाच दिवसात ६५ बाधीत झाले बाधीतांची संख्या ७३८ झाली आहे