तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:56 IST2018-08-30T00:56:02+5:302018-08-30T00:56:31+5:30

जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणार आहे. शासनाच्या या आदेशान्वये आता तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होऊन नागरिकांचा वेळ व पैशातही बचत होणार आहे.

 Seven paragraphs will be transferred without any booking | तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी

तलाठ्याविना होणार सातबारा फेरफार नोंदी

एकलहरे : जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणार आहे. शासनाच्या या आदेशान्वये आता तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होऊन नागरिकांचा वेळ व पैशातही बचत होणार आहे.
सातबारा संगणकीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून यापुढे जमीन, जागा, घर, प्लॉट इत्यादी खरेदीची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी कार्यालयाकडूनच आॅनलाइन यंत्रणेद्वारे थेट तलाठ्यांच्या आॅनलाइन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित कागदपत्रे पाठवण्यात येतील. त्यावर तलाठ्यांनी १५ दिवसांत फेरफार अर्थातच खरेदी केलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद करावी. असे आदेश राष्टÑीय भूमी अभिलेख आधुनिकीकरणाचे समन्वयक रामदास जगताप यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  तलाठ्यांनी फेरफारची पंधरा दिवसांत नावनोंदणी करावी, अशी मुदत देण्यात आली असून, या मुदतीत तलाठ्यांनी नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत नोंद न केल्यास तलाठी यांच्याकडे किती नोंंदी प्रलंबित आहेत, हे आॅनलाइन प्रक्रियेत तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाºयांना दिसणार आहे.

Web Title:  Seven paragraphs will be transferred without any booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.