घरफोड्यांमध्ये सात लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: July 4, 2017 00:57 IST2017-07-04T00:55:43+5:302017-07-04T00:57:13+5:30
घरफोड्यांमध्ये सात लाखांचा ऐवज लंपास

घरफोड्यांमध्ये सात लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात घरफोडी सत्र सुरूच असून, अंबड व म्हसरूळ परिसरांत चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़
सिडकोच्या सुंदरबन कॉलनीतील मयूर प्रकाश सांबरे (३०, आरव व्हिला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते २९ जून ते १ जुलै या कालावधीत बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा लॅचलॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी तिजोरी चावीने उघडून त्यातील सोन्याचे दोन मंगळसूत्र, दोन सोनसाखळी, दोन हार, दोन टॉप्स, दोन अंगठ्या, लहान मुलांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एलजी मोबाइल असा पाच लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी सांबरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना पेठरोड परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये गुरुवारी (दि़ २९) घडली़ अरविंद कहार (रा़ द्वारका, नाशिक) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १ लाख रुपये किमतीचे ५१३ किलो वजनाचे कॉपर लॉट त्यांनी एसटी वर्कशॉपच्या स्क्रॅप गुदामामध्ये ठेवून सीलबंद केले होते़ चोरट्यांच्या या गुदामाच्या शटरच्या खिडकीचे गज व काचा तोडून गुदामात प्रवेश केला़
तसेच एक लाख रुपये किमतीचे कॉपर स्लॉट तोडून नेले़ या प्रकरणी कहार यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़