सात लाख मतदारांना मिळणार नवी ओळखपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:04 IST2020-07-31T23:19:50+5:302020-08-01T01:04:47+5:30
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कलावधीत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम ...

सात लाख मतदारांना मिळणार नवी ओळखपत्रे
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कलावधीत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यानुसार जिल्ह्णातील सुमारे सात लाख मतदारांना नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र प्राप्त होणार असून, मतदारांना ही ओळखपत्रे घरपोच दिले जाणार आहे.
मतदानासाठी मतदाराचा पुरावा म्हणून छायाचित्र ओळखपत्र महत्त्वाचे असते. मतदारांकडे यापूर्वीच निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र असले तरी पूर्वीच्या ओळखपत्राचा गैरवापर अधिक होत होता. संगणकीय आणि कृष्णधवल ओळखपत्र असल्याने बनावट ओळखपत्र तयार करून त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्याचा प्रकार सातत्याने समोर आल्याने निवडणूक आयोगाने सुरक्षित आणि रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार नवमतदारांना तसेच ज्यांनी ओळखपत्रातील बदलासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रकारचे मतदार छायाचित्र ओळखपत्र तयार करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या काळातदेखील काही मतदारांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात याबाबत अधिक जनजागृती करण्यात आल्याने नवीन मतदान ओळखपत्रांची अधिक मागणी नोंदविण्यात आल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे ७,५९,७०० मतदारांना रंगीत छायाचित्र ओळखपत्र मिळणार आहे.
यापूर्वी मतदारांना संगणकावर तयार करण्यात आलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात आलेले आहे. आता आकर्षक रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइकल क्लोराइड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येत आहे. ओळख पत्रासाठी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्राची प्रक्रिया सुरू होते. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत मतदारांना घरोघरी नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे.
च्नाव, पत्त्यातील बदल, लग्नानंतर नावात झालेला बदल, छायाचित्र बदलावयाचे असेल तसेच पत्ता बदललेला असेल अशा परिस्थितीत अर्ज करता येतो अशा मतदारांचे नवीन ओळखपत्र तयार होते. अर्ज केलेल्या मतदारांनाच नवीन ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबविली जाते.