कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली सात जनावरे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 17:47 IST2018-10-24T17:46:58+5:302018-10-24T17:47:11+5:30

मालेगाव : येथील म्हाळदे शिवारात कत्तलीच्या उद्देशाने बांधुन ठेवलेली सात जनावरे विशेष पोलीस पथकाने जप्त केली असून पवारवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Seven cattle seized for the purpose of slaughter | कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली सात जनावरे जप्त

कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली सात जनावरे जप्त

मालेगाव : येथील म्हाळदे शिवारात कत्तलीच्या उद्देशाने बांधुन ठेवलेली सात जनावरे विशेष पोलीस पथकाने जप्त केली असून पवारवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत.
अपर पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या विशेष पोलीस पथकाने बुधवारी सकाळी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीवरुन बुधवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हाळदे शिवारात जियाशेठ यांच्या शेत गट क्रमांक ४४ मध्ये अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने सात जनावरे बांधुन ठेवलेली होती. पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली असता जनावराचे मालक शेख जमील शेख रहेमान व जियाउर्ररहेमान मोहंमद अयुब सर्व रा. मालेगाव हे फरार झाले. पोलीसांनी घटनास्थळावरुन १ लाख ९० हजार रुपये किंमतीची सात जनावरे जप्त केली. पवारवाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Seven cattle seized for the purpose of slaughter