शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

१९हजार प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:04 IST

प्राधिकरणाच्या वतीने राज्यभरात शनिवारी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली होती

ठळक मुद्दे१ लाख ६ हजार ७१७ दावापूर्व दाखल प्रकरणेदावा दाखलपूर्व प्रकरणांपैकी १७ हजार ९३९ प्रकरणांचा निपटारा

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.८) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व अशा एकूण १९ हजार ६४४ प्रकरणांचा निपटारा झाला.प्राधिकरणाच्या वतीने राज्यभरात शनिवारी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली होती. प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणे अनेक महिन्यांपर्यंत खितपत पडलेली असतात. त्यामुळे त्याच्यावर न्यायनिवाडा होत नाही परिणामी वादी-प्रतिवादी दोघांनाही त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकरणांचा जलदगतीने एकाचवेळी न्यायनिवाडा व्हावा, या उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येते. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये फौजदारीसह व्यावसायिक, कौटुंबिक, अपघाती अशी विविध प्रकारची प्रकरणे समोर आली. जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी १० हजार ३९९ प्रकरणे ठेवण्यात आली तसेच १ लाख ६ हजार ७१७ दावापूर्व दाखल प्रकरणेही ठेवण्यात आली. त्यामध्ये ७३५ दिवाणी, २ हजार ९२१ तडजोडपात्र फौजदारी, २०४ अपघात नुकसानभरपाई, ५२९ कौटुंबिक वाद, २ हजार ११५ धनादेश न वटणे अशा विविध प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी (कलम १३८) एकूण ५०९, फौजदारी ७४६, बॅँकेची ४५, मोटार अपघात प्रकरणांपैकी ९५, कामगार विषयक १, कौटुंबिक वादाची १३५, भूसंपादनविषयक १४ व दिवाणी दावे १३५, अन्य ८ अशी १ हजार ७०५ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली निघाली आहेत. दावा दाखलपूर्व प्रकरणांपैकी १७ हजार ९३९ प्रकरणांचा निपटारा झाला. तसेच न्यायालयात असे प्रलंबित व दावादाखल प्रकरणे मिळून १९ हजार ६४४ प्रकरणे जिल्ह्यात निकाली निघाली. दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लोकअदालत सर्वत्र शांततेत पार पडली. लोकअदालतीत पक्षकारांसह वकिलांनीही चांगला सहभाग घेतला. अनेक वर्षांपासून प्रलंबित लहान-मोठे दावे निकाली निघाल्याने पक्षकारांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयLokadalatलोकअदालत