सटाण्यात साडेपाच हजार प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:16 IST2018-02-17T01:16:06+5:302018-02-17T01:16:40+5:30
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिली.

सटाण्यात साडेपाच हजार प्रकरणांचा निपटारा
सटाणा : तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या माध्यमातून पाच हजार ७८८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. या वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात आल्याची माहिती न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिली. येथील न्यायालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. तापडिया यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास न्यायाधीश व्ही.ए. आव्हाड, वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे, सरकारी वकील बोराळे, प्रांत प्रवीण महाजन, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, विस्तार अधिकारी नितीन देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वाधिक वसुलीत ग्रामपंचायत, पतसंस्था तसेच न्यायालयाच्या प्रलंबित प्रकरणे, दरखास्ती मोटर वाहन कायद्यान्वये फौजदारी प्रकरणे यशस्वीरीत्या तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, वादपूर्व प्रकरणातून सुमारे एक कोटी ३० लाख ४५ हजार रु पयांची वसुली करण्यात आल्याचे न्यायाधीश तापडिया यांनी सांगितले.
यावेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, वकील संघाचे अभिमन्यू पाटील, रवींद्र पाटील, सतीश चिंधडे, नितीन चंद्रात्रे, चंद्रशेखर पवार, प्रकाश गोसावी, यशवंत सोनवणे, नीलेश डांगरे, संजय सोनवणे, संजय अहिरे, के.पी. भदाणे, वसंत सोनवणे, विष्णू सोनवणे, गंगाधर सोनवणे, विश्वास सोनवणे, प्रशांत भामरे, रेखा शिंदे, सुजाता पाठक, स्मिता चिंधडे उपस्थित होते.
लोकन्यायालयात ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, पतसंस्था, बँका यांचा मोठा सहभाग होता. लोकन्यायालयात दाखल पूर्व ११ हजार ८५० व न्यायालयीन प्रकरणे, दिवाणी दावे, दरखास्ती व फौजदारी प्रकरणे ६३५ ठेवण्यात आली होती. दिवसभरात दाखल पूर्व ५७०० व न्यायालयीन प्रकरणे, दिवाणी दावे, दरखास्ती व फौजदारी असे एकूण ८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.