शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नांदगाव येथे मका, तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:17 PM

नांदगाव : सध्या मका व तूर या शेतमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नांदगाव बाजार ...

ठळक मुद्देहमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी; उपाययोजनेची मागणी

नांदगाव : सध्या मका व तूर या शेतमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नांदगाव बाजार समितीमध्ये फेडरेशनमार्फत सदर शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.नांदगाव बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी मका विक्र ीअभावी शेतकरीवर्गाकडे पडून आहे. मक्याची इतिहासात प्रथमच आवक कमी झालेली असतानासुद्धा बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने व काही प्रमाणात मका केंद्र सरकारने आयात केल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच उन्हाळ मका उत्पादनही मोठ्या प्रमाणात येणार असल्याने बाजारभावात पुन्हा घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने फेडरेशनमार्फत मका व तूर शेतमालाचे हमीभाव केंद्र सुरू करून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा. शेतकरी याबाबत बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात मागणी करत असले बाबत सभापती तेज कवडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याबाबत शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना बाजार समितीमार्फत लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती सचिव अमोल खैरनार यांनी दिली.बाजारभावात घसरणसध्या ७०० ते १४५० रुपये दराने विक्र ी होत आहे. त्यात आणखी घसरण होणार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. तसेच तूर शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन असून, बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे. याकरिता शासनाने हमीभाव केंद्र सुरू करावे. त्यामुळे शेतकरीवर्गाचे होणारे आर्थिक नुकसान टळणार असून, शेतकरीवर्गाला दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड