शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

सहायक प्राध्यापकपदासाठी २३ जूनला ‘सेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:50 PM

वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून, यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

नाशिक : वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून, यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.नाशिक जिल्ह्यातून सेट परीक्षेसाठी जवळपास दहा हजार, तर सेट परीक्षेसाठी सहा ते सात हजार उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३५वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २३ जून रोजी होणार असून, या परीक्षेसाठीचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर झाले आहे, तर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा दि. २० ते २८ जून या कालावधीत होणार आहे.सेट परीक्षेतील पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न असतील. हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना १०० प्रश्न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४० टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांना पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, नेटसाठी एनटीएच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.दोन्हीही परीक्षांसाठी दोन पेपरतीनशे गुणांसाठी परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २० ते २८ जूनदरम्यान नेटची आॅनलाइन परीक्षा होणार आहे. डिसेंबर २०१८ मध्ये प्रथमच नेट पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन पेपरची नेट परीक्षा होणार असून, पहिल्या पेपरमध्ये ५० प्रश्नांसाठी १०० गुण, तर दुसरा पेपर संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्नांसाठी २०० गुणांसाठी असे दोन पेपर होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर होईल. नेट-सेट परीक्षेसाठी यापूर्वी तीन पेपर द्यावे लागत होते. त्यात बदल करण्यात आला असून, आता दोन्हीही परीक्षांत दोनच पेपर होणार आहेत.

टॅग्स :examपरीक्षाProfessorप्राध्यापक