द्वारका येथील सर्व्हिसरोड आता एकेरीवाहतूक

By Admin | Updated: June 26, 2016 00:30 IST2016-06-25T22:14:11+5:302016-06-26T00:30:31+5:30

कोंडीवर उपाय : वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्ग

Servicroscope in Dwarka is now a lone soldier | द्वारका येथील सर्व्हिसरोड आता एकेरीवाहतूक

द्वारका येथील सर्व्हिसरोड आता एकेरीवाहतूक

नाशिक : द्वारका सर्कल हे महत्त्वाचे ठिकाण असून, या चौकात धुळे व पुणे बाजूकडून येणारी वाहने तसेच शहरातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होते. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून द्वारका चौकाकडे सर्व्हिसरोडने होणारी वाहतूक एकेरी करण्यात आली असून, या मार्गासाठी वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग दिले आहेत.
वडाळानाका (साई प्रीतम हॉटेल) कडून सर्व्हिसरोडने द्वारका सर्कलकडे जाणारी वाहने आता सर्व्हिसरोडने न जाता ही वाहने आग्रारोडने उड्डाणपुलाखालून द्वारकाकडे जातील. तसेच पखालरोडकडून संतोष मोटार गॅरेज जवळून सर्व्हिसरोडने द्वारका सर्कलकडे जाणारी वाहने सर्व्हिसरोडने वडाळा नाका साई प्रीतम हॉटेल जवळून आग्रारोडने द्वारकाकडे जातील.
द्वारका हॉटेलकडून सर्व्हिसरोडने टाकळी चौफुलीकडे जाणारी वाहने आता आग्रारोडने उड्डाणपुलाखालून टाकळी चौफुलीकडे वळतील. नानावली बाजूकडून ट्रॅक्टर हाउस जवळून झाकीर हुसेन व शिवाजी चौक कथडाकडून सर्व्हिसरोडने द्वारका चौकाकडे येणारी वाहने आता ट्रॅक्टर हाउस टाकळी चौफुली मार्गे आग्रारोडने इतरत्र जातील. त्याचप्रमाणे वडाळा नाका, नागसेननगर, वोक्हार्ट हॉस्पिटलकडून सर्व्हिसरोडने द्वारकाकडे येणारी वाहने आता वडाळा नाका उड्डाणपुलाखालून आग्रारोडने द्वारका बाजूला
जातील.
द्वारका चौकातून बागवानपुरा बाजूकडे जाणाऱ्या वाहनांनादेखील एकेरी मार्ग करण्यात आला असून, या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक आता सारडा सर्कलला यू टर्न मारून बागवानपुऱ्याकडे जातील.

Web Title: Servicroscope in Dwarka is now a lone soldier