लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:54 IST2018-10-04T17:54:07+5:302018-10-04T17:54:26+5:30

सिन्नर : येथील लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहानिमित्त मंगळवार (दि.२) ते सोमवार (दि.८) पर्यंत क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Service week on behalf of Lions Club of Sinner City | लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताह

लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताह

सिन्नर : येथील लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने सेवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहानिमित्त मंगळवार (दि.२) ते सोमवार (दि.८) पर्यंत क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिर परिसर, बाजारतळ, नाशिकवेस आदी भागांत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शहरात विविध साथीचे रोग पसरले असून स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या रूग्णांचे संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य साभाळावे. कोरडा दिवस पाळावा, पाणी उकळून गाळून प्यावे व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन अध्यक्ष राजश्री कपोते यांनी केले. यावेळी हेमंत वाजे, डॉ. विजय लोहारकर, डॉ. विष्णू अत्रे, डॉ. अरूण थोरात, अपर्णा क्षत्रिय, स्मिता थोरात, मनीष गुजराथी, जितेंद्र जगताप, नगरसेवक सोमनाथ पावसे आदिंनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: Service week on behalf of Lions Club of Sinner City

टॅग्स :Nashikनाशिक