माता पित्याची सेवा हाच धर्मोपदेश

By Admin | Updated: October 13, 2016 23:32 IST2016-10-13T23:26:24+5:302016-10-13T23:32:37+5:30

रामकृष्ण महाराज : निफाड येथे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळातर्फे स्मृतिदिन

The service of parents is the sermon | माता पित्याची सेवा हाच धर्मोपदेश

माता पित्याची सेवा हाच धर्मोपदेश

 निफाड : सर्व धर्म हे माता पित्याची सेवा करा हि आदर्श शिकवण शिकवतो असे प्रतिपादन जगतगुरु द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज देवाचार्य महाराज यांनी केले. निफाड येथील न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने माता पिता स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड , सचिव रतन पाटील वडघुले, मधुकर राऊत , निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे , नगरसवक सुनीता कुंदे , मंगल वाघ , साहेबराव आगळे ,निफाड सोसायटी चे अध्यक्ष शिवाजी ढेपले , आदी उपस्थित होते.
प्रारंभी वि. दा. व्यवहारे यांनी प्रास्तविक केले रामकृष्ण महाराज यांचा सत्कार प्रल्हाद पाटील कराड यांच्या हस्ते करण्यात आला माता पिता दिनाचे औचित्य साधून आपल्या माता पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रवचनात मार्गदर्शन करतांना रामकृष्ण महाराज म्हणाले की आपल्या जीवनात माता पिता आपले आदर्श असतात ते जे संस्कार लहानपणी मुलावर करतात त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्व घडत असते आजच्या काळातील तरु णांनी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन कार्य केल्यास हि तरु ण मंडळी देशाचे आदर्श नागरिक बनतील असे ते म्हणाले
सुत्रसंचलन गुलाब टकले यांनी केले तर आभार प्रदर्शन रतन पाटील वडघुले यांनी केले.याप्रसंगी वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे सदस्य भालचंद्र मोगल , के .के.निकम , मालती वाघवकर , देवेंद्र सांबरे , अलका जाधव , ना कुलकर्णी , माधव जाधव , आसावरी देवगावकार ,एन .एल .जाधव ,शरद कुरकुरे , रामनाथ कराड , अंबादास गोळे ,रमेश जाधव ,कोंडाजी खालकर ,नानासाहेब वडघुले ,प्रभाकर नागरे ,रघुनाथ कुंदे , संपत कराड , आदीं उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The service of parents is the sermon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.