सेवादलाकडून स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:32 IST2018-02-26T00:32:51+5:302018-02-26T00:32:51+5:30

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीतील सेवकांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात रविवारी स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला.

 Service Delivery Sanitation Campaign | सेवादलाकडून स्वच्छता अभियान

सेवादलाकडून स्वच्छता अभियान

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील संत निरंकारी मंडळ शाखा शिरेवाडीतील सेवकांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात रविवारी स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्व परिसर स्वच्छ केला. संत निरंकारी मिशन नवी दिल्ली शाखा शिरेवाडी, ता. इगतपुरी यांनी सद्गुरु माता सविंदरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि.२३ व २४ रोजी भारतभर सद्गुरु बाबा हरदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. शुक्र-वारी शिरेवाडी येथे विशाल सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. प.आ. प्रचारक महात्मा अप्पाजी कुलकर्णी महाराज नाशिक यांच्या उपस्थितीत विशाल सत्संगाचा कार्यक्रम झाला. नर सेवा नारायण सेवा ही सद्गुरुंची शिकवण घेऊन शनिवारी (दि. २४) धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरेवाडी शाखेने सकाळी गावचे सरपंच नंदू जाधव, धामणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानास सुरुवात केली. शिरेवाडी शाखेचे भाऊरावजी धादवड, पुरुष सेवा दल प्रमुख पांडुरंग बोराडे, महिला सेवा दल प्रमुख सुनंदा घोडे व त्यांचे पन्नास सहकारी यांनी हातात झाडू, पावडे, खराटा घेऊन रुग्णवॉर्ड, आॅपरेशन थिएटर, आॅफिस, मेडिकल स्टोअर, स्वच्छतागृह व सर्व खोल्यांची तसेच परिसराची स्वच्छता केली. यावेळी महात्मा ठकाजी बांबळे, रामदास घाणे, कैलास कोरडे, मच्छिंद्र रुपवते, मारुती धादवड, संजय धादवड आदी सेवा दल उपस्थित होते. शेवटी सर्व निरंकारी मंडळाच्या टीमचा डॉक्टर व सरपंच यांनी सत्कार केला.

Web Title:  Service Delivery Sanitation Campaign

टॅग्स :Nashikनाशिक