शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

सर्व्हर डाउनचा विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:58 PM

शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने होत असल्याने विद्यार्थी-पालक अत्यंत त्रस्त झाले आहेत.

नाशिकरोड : शाळा-महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखले मिळविण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व्हरच्या व इतर अडचणींमुळे दाखले वितरणाचे काम धीम्या गतीने होत असल्याने विद्यार्थी-पालक अत्यंत त्रस्त झाले आहेत.जिल्हा प्रशासनाकडून पाच दिवसांपूर्वी (दि.२०) नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, सिडको येथील चार सेतू कार्यालये बंद करण्यात आली. ऐन शाळा, महाविद्यालय प्रवेशप्रक्रिया सुरू असताना जिल्हा प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केल्याने विद्यार्थी व पालकांची विविध दाखल्यांसाठी मोठी गैरसोय होत आहे. सेतू कार्यालयात उत्पन्नाचा, डोमासाईल, नॉन क्रिमिलीयर, जात प्रमाणपत्र व रेशन कार्डमधील नाव कमी करणे, नवीन समाविष्ट करणे, नवीन रेशनकार्ड काढून देणे ही कामे केली जातात. शहरातील चारही सेतू कार्यालयांची गेल्या २३ मेपर्यंतच मुदत होती. मात्र त्यानंतरही सेतू कार्यालय जिल्हा प्रशासनाने २० जूनपर्यंत सुरू ठेवल्याने विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारणे व दाखले काढून देण्याचे काम सुरू होते. चारही सेतू कार्यालये बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात २० जूनपर्यंत स्वीकारलेल्या अर्जांचे दाखले देण्याचे काम सुरू आहे. सर्व्हर डाउन व इतर अडचणींमुळे दाखले देण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. विद्यार्थी, पालकांना त्यामुळे तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे  लागत आहे.निर्धारित वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेशाला अडचण निर्माण होत असल्याने पालकांमध्ये चिंता पसरली आहे. सेतू कार्यालयच बंद केल्याने शहराच्या विविध भागातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना येण्या-जाण्याचा खर्च करत जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयonlineऑनलाइन