मोबाइलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:06+5:302021-09-07T04:18:06+5:30

शालेय परिसरातील मनमोकळ्या वातावरणातील मित्रांच्या गराड्यातील असलेली शाळा बदलून, या मुलांची असलेली शाळा चार भिंतीच्या कोनाड्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या ...

Serious effects of mobile overuse on students | मोबाइलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम

मोबाइलच्या अतिवापराने विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम

शालेय परिसरातील मनमोकळ्या वातावरणातील मित्रांच्या गराड्यातील असलेली शाळा बदलून, या मुलांची असलेली शाळा चार भिंतीच्या कोनाड्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या कंटाळवाण्या मोबाइलवरती बसवून शिकायला सुरुवात झाली. मोबाइलमध्येही ती चांगली पारंगत झाली, परंतु आता त्या मोबाइल वापराचे गंभीर असे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. मुलांना पुस्तक वाचताना, पुस्तकाच्या ओळींवर बोट ठेवताना पुढील पान उलगडण्यासाठी मुले जेव्हा हातात घेतात, त्या वेळेला मोबाइलसारखी बटणे दाबण्याचा प्रयत्न पुस्तकावर करताना दिसतात. पुस्तकाची पाने उलटावी लागत असतात, ही गोष्ट ती विसरून जातात. कारण मोबाइलचा वापर ते करतात आणि नेक्स्ट बटन दाबून पुढील पान मोबाइलवर बदलते तसे पुस्तकावर का येत नाही, अशा पद्धतीच्या प्रश्न मुलांना पडतो आहे. त्याचबरोबर, डोळ्यांचे आजार गंभीर होऊ लागलेले आहेत. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शालेय परिसरामध्ये शाळेच्या वातावरणामध्ये शिक्षण घेण्याचा आनंद मिळावा, अशी अपेक्षा आता पालकवर्गाकडूनच केली जाऊ लागली आहे.

Web Title: Serious effects of mobile overuse on students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.