शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गोधनाच्या क्षुधाशांतीसाठी गोशाळाचालकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:09 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे.

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चाऱ्याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक गावांत चारा शिल्लक आहे. परंतु गावांनी शहरी भाागातून किंवा अन्य ठिकाणहून येणाºया नागरिकांना गावबंदी केल्याने चारा असूनही तो आणता येत नाही अडचण झाली आहे.  गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी सुरू आहे. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच बंदचा परिणाम मुक्या प्राण्यांवरदेखील होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गो शाळांनादेखील त्याचा फटका बसला आहे. नाशिकमधील अनेक गोशाळांपर्यंत चाराच पोहोचत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणाची साधने बंद असून अनेक ठिकाणी गावांमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्यानेदेखील चारा आणता येत नसल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका गोशाळेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांनी चारा नेण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु अन्य अनेक गोशाळामंध्ये अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे मजूर उपलब्ध नाही. काही ठिकाणी चारा आणि मजूर उपलब्ध आहेत. परंतु मजूर गावकºयांच्या विरोधात जाऊन चारा भरण्यास तयार नाही. सिडकोतील मंगल गोवत्स सेवा ट्रस्ट संचलित गो शाळेत सध्या २४ गायी आणि वासरे आहेत. चार महागल्याने या गो शाळांमध्ये एक वेळ चारा आणि एक वेळ भाजीपाला दिला जात असल्याचे या गोशाळेचे संचालक पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले. सध्या चाºयाचे दर अडीच हजारांवरून साडेपाच हजार रुपये प्रति टन असे झाले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे शहराकडे चारा येत नाही, अशी अवस्था आहे. सध्या तर गोशाळांना सहकार्य करणाºया दानशुरांनी पाठ फिरवल्यानेदेखील खर्च निघणे कठीण झाले आहे. तपोवनातील कृषी गो सेवा ट्रस्टच्या गो शाळेत २०० गायी आहेत. परंतु येथे सध्या चारा पाण्यासह अनेक अडचणी आहेत. सध्या महावीर इंटरनॅशनलसारख्या संस्थाच्या मदतीने गो शाळा कशी तरी सुरू आहे. परंतु लॉकडाउन आणि संचारबंदी वाढल्यास अडचण होणार आहे.अर्थात, काही गो शाळांकडे पूर्वनियोजनानुसार अगोदरच चाºया पाण्याची व्यवस्था असल्याने अडचण उद््भवत नाही. गंगापूररोडवरील मोरोपंत पिंगळे गो शाळेत नियोजनानुसार चाºयाचा रीतसर साठा करून ठेवण्यात आला असल्याने अडचण उद््भवलेली नाही असे या गोशाळेचे प्रमुख राजाभाऊ मोगल यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे नंदिनी गो शाळेत चारशे गायी आहेत. मात्र, पूर्वनियोजनानुसार सध्या चारा असल्याने अडचण जाणवत नसल्याचे महेंद्र पोद्दार यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक